"घोषा पध्दत "

"घोषा पध्दत "
पहिल्या काळी म्हणजे आपल्या आजी, पणजी च्या काळात ही घोषा पध्दत होती. आता घोषा पध्दत म्हणजे काय, तर महिलांना कोणा पर पुरूषा समोर येण्यास बंदी होती. आणि जर काही कारणास्तव यायचे झाले तर, डोक्यावर पदर घ्यायचा ,तोही पूर्ण तोंड झाकून जाईल असा. आणि जर महिला घरातून बाहेर कुठे गेल्या, वेषीमधून, रोडवरून तर त्या चप्पल हातात काढून घेत असत. आधीच्या ह्या परंपरेमुळे महिलांना फक्त "चूल आणि मूल"माहीत होते. पण काळाच्या ओघात हे सगळे मागे पडत गेले, आणि महिलां वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाऊ लागल्या. घोषा पध्दत मागे राहीली. महिलांना नवनवीन संधी येऊ लागल्या त्यात त्या पुढे गेल्या. आज महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात. त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. काळ बदलला , जीवनशैली बदलली आणि महिला "चूल आणि मूल" सांभाळून बाहेर जाऊन जाॅब, इतर कामे करू लागल्या. त्याना मान सम्मान मिळू लागला. पहिल महिलांना उबंरयाबाहेरचे माहीत नव्हते. ज्या समाजसुधारकांनी महिलांसाठी आवाज उठवला आणि महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तेव्हा पासून महिला वर्ग घरातून बाहेर पडला आणि नवनवीन संधीचा फायदा करून घेतला. आज शिक्षणाला खूप महत्व आहे, म्हणून सरकारने "साक्षरता" अभियान चालू करून महिलांना साक्षर बनवले. आणि त्याचे जीवन सुधारले. आजच्या काळात घोषा पध्दत मागे पडली,आणि महिला घरातून बाहेर पडून स्व:ता पायावर उभ्या आहेत. आज जर घोषा पध्दत असती तर, महिलांना घराबाहेर पडून काही करणे शक्य नव्हते. आज त्या ताठ मानेने समाजात वावरू शकतात. रूढीपंरपंरा पाळाव्यात पण त्या एका लिमिट मध्ये, त्याचा मानवतेवर परिणाम होता कामा नये.
#marahi #women #old #genration #bolg #ghosha #womenrespect #newidea
थोडे नवीन जरा जुने