मैत्री

"मैञीणी"
मैञीणी, हा शब्द ऐकला छान वाटतो, तसच ते मैत्रीच नात ही असत.अगदी खट्याळ,नटकट आणि तितकेच स्वच्छ प्रेमळ हो ना.
     काल खुप दिवसांनी काय खुप वर्षानी  एका मैञीणीचा फोन आला. कधी शाळा, कॉलेज मध्ये भेटलेलो आम्ही, तेव्हा पासुन ते आता पर्यंत कधी बोलण, भेटन नाहीच ऐवढया वर्षातून तिने नंबर घेऊन काॅल केला. खुप आनंद झाला. अगदी शाळा, कॉलेज चे दिवस पुन्हा डोळ्यासमोर आले. ज्या मैञीणी रोज भेटत होतो. त्याचा आवाज ऐकला तरी तो ओळखला ही नाही. किती फरक होतो ना शालेय जीवनानंतर लग्न, मुले, संसार या मध्येच असतो. आणि ऐक आमच्यातील काही जणी मध्ये ऐवढा फरक दिसतोय की, ओळखणे ही मुश्किल झाले. आम्ही ऐकमेकींचे  फोटो बघीतले😜😅 किती फरक दिसण्यात, बोलण्यात .
   खरंच ऐवढा फरक होतो का,लहानपणी एकञ खेळलो, मज्जा केली त्याना या संसारात बडून सगळे विसरुन गेलो  .मस्त असत ना मैञीणी बरोबर खेळणे, खाणे,गप्पा मारणे. जर मैञीणी बोलत बसल्या तर टाईम सुध्दा कळत नाही. ऐवढया बोलण्यात गुंग असतात. असतच हे नाते अस थोड प्रेम, कधी रागावणे तर कधी जीवाला जीव लावणे.
  मी तर,म्हणेन की,मैत्रीणी आटवा त्याना भेटा आणि पुन्हा ते जुने दिवस जगा. सुख:दुख तर प्रत्येकाला आहेत ते कधी कमी नाही होणार, म्हणून कधीतरी आपल्या मैञीणीना भेटा मस्त ऐनजाॅय करा. बघा ना कालच्या ऐका फोन मुळे किती तरी आठवणी जाग्या झाल्या.लहानपण आणि शालेयजीवन पुन्हा एकदा  समोर आले .☺
मग कधी बोलवताय तुम्ही तुमच्या मैञीणीना, 🙂"जीवन सुंदर आहे "आनंदी रहा.
#bolg #friends #enjoy #easylife#friendship#

थोडे नवीन जरा जुने