Dudhi Kofta recipe दूधी भोपळ्याचा कोफ्ता

Dudhi Kofta recipe दूधी भोपळ्याचा कोफ्ता
 दुधीभोपळा म्हणल की, सगळ्याची तोंड वाकडी होतात, आवडीने अस कोणी खात नाही. जो हसत दुधी भोपळा खातो. दुधीभोपळयाचा असा एक प्रकार आहे जो केला की,तुम्हाला खाणार्‍या च्या ताटात एक कण ही राहिलेला दिसणार नाही. तर,तो प्रकार म्हणजे "दुधीभोपळा चा कोफ्ता "हो ऐकदा घरी करुन तर बघा सगळे वारंवार याची फर्माईश करतील. तर,चला पाहुया याची मस्त चस्क असा दुधीभोपळा कोफ्ता.

साहित्य --
1-- दुधीभोपळा
1-- वाटी बेसन पीठ
2-- कांदे
2-- टोमॅटो
1.2-- हिरवी मिरची
1--   लसुण
1 -- तुकडा आल (अदरक)
अर्धा -- चमचा हळद
अर्धा -- गरम मसाला
2-- चमचे लाल तिखट
1.2- लाल सुखी मिरची
1.2  -- लवंग
1--    तुकडा दालचिनी
1.2-- चमचे तेल,कोफ्ता तळण्यासाठी वेगळे तेल लागेल.
चिमूटभर साखर
मीठ चवीनुसार
कोथिंबीर (कांदा आणि टोमॅटो ची पेस्ट करून घ्या म्हणजे ग्रेव्ही मध्ये दाट पणा येतो.)
कृती -- प्रथम दुधीभोपळा चांगला स्वच्छ धुवून घेऊन, खिसुन घ्या.
खिसुन घेतलेला दुधीभोपळा एका मोठ्या प्लेट मध्ये त्याच्यातील पाणी पिळून घ्या. त्या खिसलेल्या दुधी मधून पुर्ण पाणी निघाले पाहिजे. पिळून घेऊन झाले की त्त्यामध्ये गरम मसाला, आल लसुण पेस्ट, लाल तिखट ,कोथिंबीर, मीठ घालून त्यात बसेल येवढे बेसन पीठ घालून मिक्स करून घेऊन. त्याचे छोटे -छोटे गोळे करून मंद आचेवर तळुन घ्या.
नंतर ग्रेव्ही साठी -------: एका कढईत थोडे तेल टाकुन त्यात फोडणी साठी लवंग, दालचिनी हिरवी मिरची लालसुखी मिरची  टाका. नंतर आल -लसुण पेस्ट घालून थोडे भाजुन घेऊन त्यात कांदा आणि टोमॅटो ची पेस्ट करुन घाला .लाल तिखट, गरम मसाला, हळद घालून चांगले तेल सुटे पर्यंत भाजुन घ्या. आणि त्यात आपण तळुन रेड्डी केलेले कोफ्ते टाकून, तुम्हाला हवे तेवढे पाणी घालून, चवीनुसार मीठ घाला. आणि वरून मस्त कोथिंबीर टाकून सर्व करा. "दुधीभोपळा चा कोफ्ता "
टेस्ट ला ही मस्त आणि खाताना होतो लगेच फस्त।
थोडे नवीन जरा जुने