Dal tadka Recipe दाल तडका

"Dal tadka "दाल तडका "
लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळ्याची मनपसंद दाल, म्हणजे "दाल तडका "मस्त अशी रोटी मग ती साधी, बटर असो दाल तडकाची टेस्ट त्याचबरोबर मस्तच असते.अस कोणीच नाही की, ज्याला डाळ तडका आवडत नसेल. आपल्या परिवाराची पहिली पसंती दाल तडका आहे.जरी कधी आपण हाॅटेल मध्ये गेलो तरी इतर ग्रेव्ही डिश मागवल्या तरी दाल तडका सुद्धा आपण मागवतो. कारण रोटी आणि दाल तडका खाल्ल्याशिवाय पोट भरल्या सारखे वाटतच नाही. तर असाच  आपल्या सर्वांच्या आवडीचा दाल तडका ची रेसिपीच साधी आणि सोपी. रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका. 
dal tadka recipe
Dal Tadaka

साहित्य --
तूरडाळ 1 वाटी,
टोमॅटो
हिरवी मिरच1. 2
लाल मिरची
कढीपत्ता
लसुण
अदरक 
लाल तिखट
जिरे
मोहरी
हिंग,हळद 
तेल,मीठ, पाणी. 

कृती ---: प्रथम कुकरमध्ये 1 ग्लास पाण्यात तूरडाळ, हळद ,आणि अर्धा चमचा तेल टाकून  2. .3 शिट्या करून घ्या. नंतर कुकर गार होई पर्यंत कढई मध्ये  2..3 चमचे तेल टाकून त्यात लसुण, अदरक चिरून टाका. नंतर   कढीपत्ता हि.मिरची 1, मोहरी,जिरे हिंग  लालमिरची टाकून थोडस परतुन घ्या.आणि त्यात तुमच्या आवडीनुसार तिखट लाल मिरची पावडर टाकून टोमॅटो टाका. 
टोमॅटो चांगला मिक्स झाला की, त्यात आपण शिजवून घेतलेली तूरडाळ टाका. चवीनुसार मीठ घाला.
आणि नंतर ऐका कढई मध्ये थोड तेल टाकून त्यात लाल मिरची,2.3  कढीपत्ता पान  आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून डाळीवर याचा तडका द्या. 
मस्त अशी दाल तडका रोटी एंजॉय करा.
थोडे नवीन जरा जुने