kite story

kite पतंग
आता पतंग म्हणल की,लहानपणापासून मोठया पर्यंत सर्वांना पतंग उडवाय आवडणारा खेळ.
संक्रांतीच्या वेळी जानेवारी महिन्यामधे हा पतंग बाजी चा आनंद घेतात.बिल्डींगच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत पतंग उडवण्याचा आनंद घेतात.
पण या पतंग बाजी मुळे काही दुष्परिणाम ही होतात.,माहीत असेलच ना. जस बघा तुम्ही पतंग आकाशात सोडता त्यावेळी उडणारे पक्षी असतात, त्याना त्या पतंगचा दोरा म्हणजे मांजा दिसत नाही, आणि ते त्यात अडकून जखमी होतात नाहीतर एखाद्या पक्षाचा जीव ही त्या मांजा मधे अडकून जातो.
तसच माणसाच्या जीवालाही धोका आहेच ना. आता तुम्ही म्हणाल तो कसा, तर बघा तुम्ही मनसोक्त पतंगबाजी चा आनंद घेता आणि तो दोरा,मांजा तसाच रोडवर नाहीतर इतर ठिकाणी टाकून जाता.मग खाली असेल तर तो पायात अडकतो आणि कोणी ही पडु शकत. किंवा ऐखादे वेळी तो मांजा वरती कुठे तरी अडकलेला असतो आणि गाडी वरुन येणाऱ्यांना तर दिसतच नाही इथेही कोणी जखमी होत किंवा त्यांच्या जीवावर बेतल जाता.मग आपण विचार करायला हवा ना की पतंगामुळे काय होत आणि काय नाही
पण आज मी आणि माझी मैत्रीण मुलांना स्कूल मधुन सोडुन येताना पाहीले की कोणीतरी पतंग खेळून तो झाडावरती अडकला म्हणून तसाच सोडून गेला होता. आणि माझी मैत्रीण त्यात अडकणार तोपर्यंत मी तिला थांबवून तो मांजा दाखवला आणि जायला निघाले तर,मैत्रीणी नी थांबुन तो पुर्ण मांजा गोळा करुन तो ऐका साईडला ठेवला.का तर,तिला तर मी तो मांजा दाखवला पण कोणी येताना त्याला तो दिसला नाही आणि तो पडला तर,माझ्या मैत्रिणीने तर 10 मिनिट थांबून कितीतरी जणांना त्या पतंगा च्या मांजा त अडकून पडण्यास पासुन वाचवले.
तर,पतंगबाजी करणे किंवा नाही हे प्रत्येकावर अवलंबुन आहे. मात्र माझ्या मैत्रिणीने केलेले काम आपण निश्चित करु शकतो. की ज्यामुळे कोणाला दुखापत होणार नाही. कारण त्या पतंगचा दोरा किंवा तो मांजा त्याने किती जोरात कापले जाते हे वेगळे सांगायला नको.

sankranthi
Kite 
history of kite flying in india,kite flying festival,kites,kite flying drawing,kite india bird,how to fly a kite,kite festival in different states of india


थोडे नवीन जरा जुने