"निंदक"

"निंदक"
हो निंदक, निंदक म्हणजे आपल्या आयुष्यात असणारे लोक जे तुमचेच आहेत, दाखवतात. आणि आपल्या पाठीमागे निंदा करने, नावे ठेवणे ही कामे करतात. माणसाला आयुष्यात खुप  मोठ-मोठया परिक्षा द्याव्या लागतात. शिक्षण, नोकरी, बिजनेस, व्यवसाय अशा संधी येतात, त्यात माणसाला काही संधी उंचाईवर घेऊन जातात, तर कधी खाली ही आणतात. म्हणजे चढ, उतार हा आयुष्यातील ऐक भाग आहे. आणि त्याला प्रतेक जण सामोरे जातो, आणि बाहेरही पडतो. 
      माणसाने आयुष्यात प्रगती केली की लोक त्याला डोक्यावर बसवतात, पण एखाद्याची प्रगती कमी पडली किंवा त्याच्या प्रयत्नाना अपयश आले. तर, लोक त्याची निंदा करतात, त्याला अपराधी सारखी वागणूक देतात. म्हणतात, ना माणसाला स्व:ता ची वाहवाही स्व:ता करता येत नाही. तो स्व:ताला शाब्बासकी
देऊ शकत नाही, किंवा स्व:ताला हानी पोहचवू शकत नाही, म्हणून समाजात निंदकांची भर आहे, किंवा गरज आहे, कारण त्यानी जर निंदा केली नाही तर, आपल्याला राग येणार नाही, आणि राग नाही आला तर, चूक कशी समजणार म्हणून निंदक हे असलेच पाहिजत, फक्त आपल्याला त्यातून काय घ्यायचे ते काय आपण ठरवा. लोकांनी निंदा केली म्हणून आपली प्रगती थांबत नाही उलट जास्त होईल,. कोणाचा काही विचार न करता तुम्ही तुमचे कार्य करा. लोक काय त्याच्या मनासारखे वागला तरी नावे ठेवणारच.
#gossip #man #women #human #world #everyone #bestluck
थोडे नवीन जरा जुने