योगा

"योगा "
योगा करून उत्तम आरोग्य ठेवणे हे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. आपल्या रोजच्या दिनचर्या मध्ये योगा हा केलाच पाहिजे, कारण यामुळे आपले शरीर, मन दोन्ही चांगले राहते. योगा केल्याने ताणतणाव पासून आराम मिळतो. आणि शरीरात ऐक प्रकारे ऊर्जा निर्माण होते. माणसांचे हाड, शरीर, मांसपेशी, सांधे उत्तम रहातात. आणि महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य निरोगी आणि बर्याच आजारापासून लांब राहते.
तर, योगा करतानाही तो चांगल्या पध्दतीने केला पाहिजे, जेणे करून त्याचा उपयोग आपल्या शरीराला झाला पाहिजे. त्यात काही प्रकार आहेत.
1) प्राणायाम  2)आनुलोमविलोम    3) भुजंगासन 4)  सूर्यनमस्कार  5)वक्रासन 6)पवनमुकतासन असे आजून बरेच प्रकार आहेत.  .........
1)-- योगा करताना मध्ये पाणी पिऊ नये.
2)-- योगा करताना तो योग्य पद्धतीने करा, नाहीतर ञास होऊ शकतो.
3)--- योगा नेहमी मोकळ्या आणि हवेशीर ठिकाणी करावा.
4)---  जर तुम्ही आजारी असाल तर, योगा करणे टाळा.
5)-- योगा केल्याने मधुमेह कंट्रोल मध्ये येऊ शकतो.
6)-- योगा मुळे वजन नियंत्रणात  राहते.
7)--आरोग्याच्या समस्या होऊ नये म्हणून योगा रोज करत रहा.
8)--- योगा मुळे ताणतणाव कमी तर होतोच, शिवाय ऐक प्रकारे एनर्जी येते.
9)--- हार्मोन्स नियंत्रणात  रहाते, थाईराॅईड कमी होते.
तर, तुम्ही योगा दिवस म्हणून ऐक दिवस नाहीतर, येणार्‍या प्रत्येक दिवशी योगा करा. तुमचे शरीर सुदृढ , निरोगी ठेवा. मन शांत रहाण्यासाठी प्राणायाम करून पहा, किती फायदा होतो. मग ही रोज सवय होऊन आपला नित्यक्रम होतो की नाही बघा.
नक्की योगा करा आणि फीट रहा. 🙂

थोडे नवीन जरा जुने