Happy mother's day

"Happy mother's day"
   मदर्स डे म्हणून आजचा दिवस सगळ्यानी साजरा केला, म्हणजे प्रत्येकाने आपल्या आईला मदर्स डे च्या शुभेच्या दिल्या .
    "स्वामी तिन्ही जगाचा 
      आई विना भिकारी "


  आई हा शब्द  उच्चार करतानाच आपल्या मनात ऐक वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा  आणि जे शब्दात न मांडता येणाऱ्या लहरी आपल्या मनात तयार होत असतात. त्या आईला खरच खुप खुप धन्यवाद जिने आपल्याला जन्म दिला. ह्या सुंदर जगात आणले. आणि सतत आपल्या साठी धडपडते. आपल्यावर चांगले संस्कार करते, ह्या दुनियेची जगण्याची परिभाषा शिकवते.आई ही आपली गुरू आहे, जी जगण्याची कला ,मार्ग दाखवते.
   छञपती शिवाजी महाराज ना बघा ना आई जिजामाता यानी किती कष्टाने आणि हिमतीने शिवाजी महाराज घडवले, त्याना योग्य प्रशिक्षण दिले. 
mothers day
Mother

   आपल्या लहान पणी आई आपली कशी काळजी घेत होती, जेवताना एखादी गोष्ट सांगत होती. झोपताना अंगाई गाऊन झोपवायची .काळाच्या ओघात त्या अंगाई आणि गोष्टीची जागा आता मोबाईल फोन नी घेतली आहे .  आताची मुल मोबाईल मध्ये गोष्टी ऐकतात. आणि ते बघतच झोपतात.तर,आपण आपल्या आईनी आपल्या साठी काय केले आहे, ते विसरु नका आईची काळजी घ्या, तिला प्रेम द्या .आईच्या प्रेमाचे मोजमाप कधी करताच येणार नाही. आई आपली खुप चांगली मैत्रीण होते. जिच्या बरोबर आपण प्रतेक गोष्ट शेअर करतो आणि आईच आपल्याला योग्य सल्ला ही देते . आई ही निस्वार्थ प्रेम करते.आई ला देवाचे स्थान दिले जाते, कारण आई म्हणजे आईच असते. आई म्हणजे घरातील भक्कम पाया, आधार असतो. तीच सगळ्या घराला सांभाळुन ठेवते. 
संस्काराची ठेव ,वास्तसल्याची शिदोरी,ममतेची देणं  अशा खुपसाऱ्या रूपातून आई आपल्याला एक शिकवण देते . 
अशा माझ्या आईस आणि पृथ्वी तलावरील  सर्व आईस. 

 🌹🌹  मातृदिना च्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹आई🌹🌹
थोडे नवीन जरा जुने