Sister

"बहीण "
  आपल्याला तर माहीत आहे की,प्रेमाच्या खुप व्याख्या आणि उदाहरण दिली जातात .त्यात बहिणीच्या प्रेमाविषयी तर काय वेगळे सांगावे  लागणार नाही कारण,हे नातच अस आहे थोड खोडकर, थोड भांडणार तर कधी आतोनात प्रेम करणार हे नात खुप छान आणि सामंजस्य असणारे आहे. आई नंतर सगळ्यात जास्त प्रेम करणारे कोण असत तर ती बहीण आहे. जिच्यावर आपण ही तेवढेच प्रेम करतो.अगदी लहानपणापासून आठवल तर लक्षात येईल की, आपण छोट्या मोठ्या गोष्टी ऐकमेकीबरोबर शेअर करतो. सुख :दुखात एकञ असतात. तर अगदी कपडया पासुन मेकअप पर्यंत अगदी भांडतो सुद्धा, पण त्या भांडणात सुध्दा खुप वेगळी मज्जा असते.
Sisters

    आता तर बघा ह्या कोरोना व्हायरस आल्यापासून बायकांचे फोन चेक केले तर, आई, बहीण ह्याचे जास्त नंबर दिसतील. आणि कारण ही तसेच आहे ना हो, उगाच आता नाव ठेऊ नका, कारण त्या ऐकमेंकी च्या काळजी पोटी फोन करत असतात.कोरोना मुळे खुपशी भिती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. जरी प्रत्येकाला माहीत आहे या माहामारी मध्ये कशी काळजी घ्यायची आहे. तरी आपली आई, बहीण रोज फोन करून कस सावधान रहायचे ते सांगतात, यालाच तरी प्रेम म्हणतात. स्वतःच्या आदी आपल्या माणसाची काळजी करण म्हणजेच प्रेम. समजा, ऐखादया दिवशी फोन नाही आला तरी ती जीवाची घालमेल ही तुम्ही नक्कीच समजू शकता.
आताच्या ह्याच लाॅकडाऊन काळात तरी ऐका बहिणीचा दुसर्या बहिणीला खूप आधार वाटतो, मग तो नुसता फोन वरील संवादात असो , त्यातुन त्या खूप  समस्या हल करतात.मग ती भावनिक असो, किंवा इतर कुठलीही त्या त्यातुन छोटासा मार्ग नक्कीच काढतात .लांब रहात असल्यातरी त्यात एकमेकींच्या खुप जवळ असतात. या नात्यात प्रेम ,जिव्हाळा, मैत्री सगळच भरभरुन असत,कोणत्याही स्वार्था शिवाय ,. जे नात मनोबल वाढवणार आहे. आणि कायम आपल्या बरोबर प्रतेक परिस्थिती आपल्या सोबत असते ते बहीण. ...जस बोलताना ऐकी च्या डोळ्यात पाणी आले तर,दुसरीच्या डोळ्यात ही चुटकीसरशी पाणी येत .
   पण, खरच ह ऐक बहीण नक्की असवी. थोडी खोडकर पण तितकीच प्रेमळ 😘
थोडे नवीन जरा जुने