Vastu tips वास्तु शास्त्र

Vastu tips वास्तु शास्त्र 
प्रत्येक माणसाला तीन गरजा महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये अन्न, पाणी, निवारा. .....निवारा म्हणजे आपल घर ज्या घरासाठी आणि घरातील माणसासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत असतो. त्या  घरात चांगले वातावरण असावे, स्वच्छ आणि सकारात्मकतेने सजलेले आपले घर असावे.
घर फक्त राहण्यासाठी नाही तर तिथे आपले सगळ्याचे भविष्य घडत असते. त्या घराचा आपल्या आरोग्य, शिक्षण आपले नातेसंबंध इ .अवलंबुन असतात. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असावी, घरात नेहमी प्रसन्नता असवी अस सगळ्याना वाटत असत .आपल्या घरात वास्तुशास्त्र   ला ही अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.समजा,घरात जर वास्तु विषयी काही तथ्य किवा अडचण समोर आली तर,  त्यामुळे घरातील सदस्यांवर ही नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून वास्तु शास्त्रानुसार उपाय करून घरातील दिशांना योग्य ते शास्त्रीशास्त्रीय उपाय करुन दोष नाहीसा केला जातो. भारतीय शास्त्रामधये वास्तु विषयी काही सुचना, उपाय सुचवलेले आहेत. 
  जर एखादा व्यक्ती नवीन घरामध्ये रहायला गेला की, तो ऐका सकारात्मक ऊर्जा मध्ये आलेला असतो. आपल्या जीवनात चड, उतार येत असतात, त्यात काही वास्तु ऊर्जा चा ही प्रभाव असु शकतो. तर त्यावर काही वास्तुशास्त्र उपाय आहेत ते पाहू. 
Vastu Tips


* घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असाव. त्यामुळे घरात सकारात्मकता येते .
* घरामध्ये कधीही तुटलेल्या किवा खराब झालेल्या वस्तु ठेवु नये. 
* आपण झोपत असलेल्या पलंगाचया किंवा खाॅट च्या खाली जुन्या वस्तू किंवा अडगळीचे सामान ठेवू नये.
*  घरातील बेसिन, किचन मधला नळ मधून पाणी गळत असल्यास ते लवकर बदलून घ्यावे. यामुळे आथिर्क प्रश्न उद्भवतात. 
* आपल्या घराला जास्त दरवाजे असतील तर,ते ऐका सरळ रेषेत तीन दरवाजे असु नयेत. याने वास्तु वाईट परिणाम होतो.
* चालू नसलेले घड्याळ जे आपण वापरत नसाल तर ते घरातून काढून टाकावे.
* घरातील देव्हारा हा ईशान्येकडील भिंतीवर असावा. नाहीतर पुजा करताना आपले तोंड पूर्वेला येईल अशा स्वरूपात देव्हाराची माडणी करावी.म
*राञी जेवल्यानंतर खरकटी भांडी बेसिन अथवा बाथरूम मध्ये ठेवू नये.यामुळे लक्ष्मी ची अवकृपा होते.
*  कधीही दुसर्‍याचे साहीत्य वापरू नये. एखाद्याने वापरलेले साहित्य मग ते इलेक्ट्रॉनिक असो किंवा कसे ही त्यामुळे दुसऱ्याची दरिद्री आपल्या घरात येते.
* कोणाचे तरी सामान पडून आहे म्हणून आपण घेऊन येतो.पण त्याबरोबर आपण त्या घरातील नकारात्मकता आपल्या घरी घेऊन जात असतो.
* घरामध्ये एक तुळशी वृंदावन जरुर असावे. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
थोडे नवीन जरा जुने