आई बाबाची ओढ

 आई बाबाची ओढ
 अहो आई,बाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय ,
काय करू   समजेना,              
काय उमजेना, 
कामानिमित्त  शहरात आलोय
पण,आम्ही आमचे आई बाबा हरवलोय. 
अहो आईबाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय, 
काही संकट आले की,अस वाटत सर्वच गमाऊन बसतोय, 
अस वाटतय शहरात येऊन फसलोय.
एकदा येऊन तुम्हाला मन भरून भेटावस वाटतय,
आनंदाचे आश्रू घेऊन खुपस रडावस वाटतय. 
अहो आईबाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय, 
लग्न झाले आणि नवराबायको शहरात आलो,
आणि स्वप्नाच्या दुनियेत सारी नाती विसरून गेलो, 
आता नियतीने घेतलीय सर्वाची परिक्षा, 
तुमच्या पासुन दूर रहाण्याची शिक्षा.
indian
Parents
 अहो आईबाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय, 
मी स्वप्नात रोज तुम्हाला मारतेय मिठ्ठी आणि उठून बघते तो काय ते स्वप्नच असते, 
अस वाटत या संकटातून सुटका होईल ना, 
हे देवा मला माझ्या आई बाबा ना एकदा तरी  भेटवशील ना, 
अहो आईबाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय. 
हे कोकरु तुमच वेड झालय, 
आई बाबांना भेटण्याची वाट बघतय, 
येथे प्रेम जिव्हाळा काही राहिला नाही माणसामध्ये, 
पण,विश्वास आहे, हे सर्व आहे माझ्या आई बाबा मध्ये, 
म्हणून अहो, आई बाबा आज आमचा जीव फार गुदमरतोय.
थोडे नवीन जरा जुने