"श्रावण महिना "

"श्रावण "
     श्रावण महिना म्हणले की निसर्गाच्या सानिध्यात लपलेली हिरवळ आपल्याला दिसते, किती सुंदर आणि छान निसर्ग दिसतो. सगळीकडेच हिरवळीची नवलाई असते. पाने, फुले, सगळीकडील नवी नवरी नटल्यासारखे भासते. जणू नवी नवरी सुंदर शालू नेसून बसली आहे. 
 " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात
होते सरसर क्षणात येथे ऊन पडे"
       श्रावण महिन्यात असेच असते, एका क्षणात पाऊस येतो तर लगेच ऊन ही पडलेले दिसते. श्रावण महिन्यात ऊन, पाऊसाचा खेळ हा चालूच असतो. थंडगार हवा मधेच पाऊस, कधी हवेची थंडगार झूळूक मनाला स्पर्श करून जाते. श्रावण महिन्यात येणारे सणवार , नागपंचमी, रक्षाबंधन,आणि पुढे लगेच आपले लाडके बाप्पा. 
    श्रावण महिन्यात महिला उपवास करतात. कोण श्रावणी करते, म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि ऐक वेळ रात्री जेवायच याला श्रावणी उपवास म्हणतात. Eकोणाच्या घरी थाटामाटात "मंगलागौर" साजरी करतात. मंगलागौर ला महिला विविध कला, गाणी नृत्य करतात. फेर धरून डान्स केले जातात. त्यात फुगडी, काटवट कणा, झिम्मा, सुप घेऊन नृत्य असे कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने महिला नृत्य करून मंगलागौर साजरी करतात. श्रावण महिन्यात महिला उपवास करतात, पण स्व:ताची तबेत सांभाळून उपवास करा, फलाहार, खिचड़ी  हे खा, ज्यूस घ्या. जर खाऊनपिऊन उपवास केला तर, देव आपल्याला काही बोलणार नाही. मनापासून देवाला जोडलेला हात ती प्रार्थना देवाजवळ पोहचतेच. तर, श्रावण महिन्याचा आणि सणाचा भरपुर आनंद घ्या, छान हिरवळ निसर्गाचा आनंद घ्या.
#blog #shravan #nature #fast #women #manglagur
थोडे नवीन जरा जुने